लोककवी वामनदादा कर्डक जन्म शताब्दी समिती अध्यक्षपदी कवी किरण येले यांची निवड

           कल्याण , प्रतिनिधी : लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी कवी किरण येले यांची निवड  करण्यात आली आहे.     


      

अनेक कवितागझल आणि गीतांतून समता-बंधुता-न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार खेडोपाडी पोहचविणारे लोककवी वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी १५ ऑगस्ट २०२१ पासून आरंभ होत आहे. समाजपरिवर्तन लढ्यासाठी आपली लेखणी तहहयात झिझवणाऱ्या या लोककवीला मानवंदना म्हणून पु ल कट्टाकल्याण या सामाजिक- सांस्कृतिक मंचाने जन्मशताब्दी साजरी करण्याचा मानस केला आहे.यास्तव पु ल कट्टाकल्याण येथे समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांचीकोरोना निर्बंधांचे पालन करीतबैठक आयोजित करण्यात आली होती. कल्याण शहर व परिसरातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते कवी- कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी आणि प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आलीसमितीतील इतर पदाधिकारी यांची देखील निवड करण्यात आली आहे.वामनदादा कर्डक यांचे जन्मगाव देशवंडीता. सिन्नरजि. नाशिकचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांना विशेष निमंत्रीत म्हणून  समितीत समाविष्ट करण्यात आले आहे. काही कार्यक्रम देशवंडी येथे देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे समितीने कळविले आहे. १५ ऑगस्ट २०१२१ रोजी जन्मशताब्दी उदघाटन कार्यक्रमकोरोना निर्बंधांचे पालन करीतआयोजित करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments