४५जेष्ठ नागरिकांना "आनंदी संध्याकाळ सन्मानपत्र" देऊन गौरव


■जेष्ठ नागरिक मंडळाचे कार्य पाहून मला ऊर्जा मिळते- नरेंद्र पवार..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जेष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीचे काम पाहून मला कार्य करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. जेष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीने कल्याण शहरातील राणी लक्ष्मीबाई जेष्ठ सेवा मंडळाच्या सभागृहात आनंदी संध्याकाळ सन्मानपत्र वितरण सोहळ्यात पवार बोलत होते.कल्याणमध्ये २८ जेष्ठ नागरिक मंडळ असून जेष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी मागील महिन्यात ऑनलाईन कला गुण दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कल्याणमधील अनेक जेष्ठांनी सहभाग नोंदविला व आपली कला सादर केली यामध्ये काव्यवाचनकथाकथनगाणी तसेच स्वरचित कवितांचे जेष्ठ नागरिकांनी सादरीकरण केले. यामधील ४५ जेष्ठांना आनंदी संध्याकाळ सन्मानपत्र देऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुखसचिव प्रभाकर बाविस्करमहिला प्रमुख वर्षा बाविस्करराणी लक्ष्मीबाई जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा केळशीकरसचिव पुरुषोत्तम जोशीअन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रभाकर बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments