अण्णाभाऊं साठेंचे स्मारक उभारण्याची भाजपाची मागणी

 

■लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जगदविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती डोंबिवली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले होते.      लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रचंड मोठं योगदान असून त्यांनी संपूर्ण समाज प्रबोधनातून चळवळीचे काम खूप मोठ्या प्रमाणात उभा केले आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टीने नेहमीच आग्रह केला आहे. समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी याची मागणी केलेली आहे.          तसेच भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक डोंबिवली याठिकाणी उभारण्यात यावा याकरिता प्रमुख मागणी करत असून स्मारका साठी लागणारा खर्च अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी पूर्णपणे उचलतील यासाठी स्मारक मंजूर करण्याची मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली.अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्याच्या दीड दिवस शाळेत जाऊन इतिहास घडवला जागतिक कीर्तीचे साहित्यकार म्हणून त्यांचे नाव घेतलं जातं. सर्व राष्ट्रपुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून समाजातील सर्वसामान्य नागरिक आणि तरूणांपर्यंत माहिती जावी याकरिता भारतीय जनता पार्टी नेहमीच या शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करीत असते. यावेळी लहान मुलांना रेनकोट चे वाटप करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments