इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोघे जण किरकोळ जखमी कल्याणातील आर्चीस अपार्टमेंट मधील घटना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  इमारतीच्या घराचे स्लॅब प्लास्टर व हॉल मधील सिलिंग कोसळले तर हॉल मध्ये बसलेल्या घर मालक व त्यांच्या मुलाच्या अंगावर सिलिंगची पीओपी शीट कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत घरातील सामान शिफ्ट करून तूर्तास दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.              कल्याण पश्चिमे कडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चीस अपार्टमेंट मधील दुसर्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम, हॉल मधील स्लॅब जीर्ण झाले असून स्लॅब मधील लोखंडी सळ्याना गंज लागल्याने सळया जीर्ण झाल्याने  स्लॅबचे प्लॅस्टर निघाल्याने केवळ लोखंडी सांगाडा उरला असल्याने स्लॅब धोकादायक बनलेला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमाराला जावडेकर यांच्या घरातील हॉल च्या सिलिंगचा स्लॅब अचानक पणे कोसळला तसेच हॉल मधील सलिंगला लावलेली पीओपीची शीट हॉल मध्ये बसलेलले मकरंद जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.या घटने प्रकरणी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाच्या  जवानांना  घटनेची माहिती  कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी घाव घेतली. जावडेकर यांच्या घरातील किचनहॉल व बेडरूम च्या सिलिंगची पाहणी केली असता त्यांना सर्वच सिलिंग धोकादायक असल्याचे दिसून आले. सिलिंगचे प्लॅस्टर ही निघाले असून लोखंडी सळ्या गंजलेल्या व प्लॅस्टर फुगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने अन्य स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे घरात राहणे धोकादायक  असल्याने  अग्निशमन दलाच्या जवानांनी जावडेकर यांच्या कुटुंबियांना अन्य ठिकाणी शिफ्ट  होण्यास सांगितल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments