मनसेमुळे मिळाला रुग्णवाहिका चालक आणि वॉर्ड बॉय यांना न्याय

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवाह न करत दिवस रात्र सेवा देणारे रुग्णवाहिका चालक आणि वॉर्ड बॉय यांना मागील सहा महिन्या पासून पगार मिळाला नव्हता. सगळीकडे पगारासाठी हात पाय मारून ते थकले आणि शेवटी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांच्यामुळे जवळ जवळ वीस लोकांना त्यांची थकबाकी मिळायला सुरुवात झाली. थकबाकीची पहली रक्कम खात्यात आल्यावर त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना काळात कोरोना रुग्ण वाढत असताना रुग्णवाहिके वर चालक आणि वॉर्ड बॉय ह्यांची भर्ती करण्यासाठी मेसर्स विशाल एक्स्पर्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडपुणे यांच्याशी करार केला आणि १८ हजार प्रति चालक मानधन देण्याचे निश्चित केले.  हा करार करताना महापालिकेने स्पष्ट सांगितले की रुग्णवाहिका चालकांना चोवीस तास काम करायचा आहे आणि बोलविल्यावर हजर न राहणाऱ्या चालकांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. महापालिकेच्या करारा अनुसार रुग्ण वाहिका चालक आणि वॉर्ड बॉय ह्यांनी सेवा दिली. पण  ठेकेदारांनी ह्या सर्वाना पगार देण्यात दिरंगाई करायला सुरुवात केली.कधी भविष्य निर्वाह निधी आणि कधी अन्य कारण सांगून तब्ब्ल सहा महिन्या पासून कुणाला ही पगारातुन एक ही दमडी मिळाली  नाही. तेव्हा रुग्णवाहिका चालक आणि वार्डबॉय यांनी मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि विभाग अध्यक्ष काझीम शेख यांची भेट घेत आपली समस्या सांगितली.  या प्रकरणात रुपेश भोईर यांनी विशेष लक्ष देऊन कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि पाठपुरावा करून सर्वाना त्यांची थकबाकी मिळवून दिली. थकबाकीची पहिली रक्कम जेव्हां सर्वांच्या खात्यात अली तेव्हां सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. या सर्वानी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments