विद्यादान करणाऱ्या शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी


■सम्राट अशोक विद्यालयाच्या शिक्षकांची  पूरग्रस्त वाड्या वस्तीत जाऊन मदत....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक परिवारांचे संसार पाण्याबरोबर वाहून गेलेत. पूरग्रस्तांच्या मदतीकरिता संपूर्ण महाराष्ट्रात ओघ सुरू आहे परंतु अनेक ठिकाणी वाड्या खेड्यांवर रस्ता नसल्याने मदत पोहोचलेली नाही. पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षक शिक्षणाबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनागरिकांपर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून प्रेरणा देण्याचे काम करत असतात. महाड पासून १३ किलोमीटर अंतरावर दादलीढालकाठी सरवलीकोंडिवते बौद्धवाडी ठिकाणी स्वतः जाऊन संसारोपयोगी वस्तुंची मदत केली.संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्या मार्गदर्शनाने शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने शाळेच्या शिक्षकांनी काही रक्कम जमा केली. त्या रकमेची  भांडी विकत घेतली. दादली,ढालकाठी सरवली  कोंडीवते बौद्धवाडी या ठिकाणी जाऊन साडीतांदूळ व भांड्यांचे किट 100 हून अधिक परिवारांना वाटप केले.  शाळेचे शिक्षक गणेश पाटीलओमप्रकाश धनविजयसंध्या पाटीलसंगीता महाजनमाधुरी काळेउर्मिला साबळेशोभा देशमुखसचिन धनविजय गणेश पालांडे आणि विद्या कांबळे यांच्या एकत्रित सहकार्याने पूरग्रस्तांना आम्ही मदत करू शकलो असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.बौद्ध वाडी येथील नवयुवक दीपक सोनवणे म्हणाले आमच्यापर्यंत शासकीय मदत पोहोचत नाही. अनेक कुटुंबातील व्यक्ती आजारी आहेत. वैद्यकीय मदतीची गरज आहे. वैद्यकीय मदत तात्काळ मिळायला हवी. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पोलादपूर चे अध्यक्ष विजय दरेकर महाडचे अध्यक्ष संतोष कदम यांच्यामार्फत गरजू लोकांपर्यंत पोहोचलो. त्यांनी दिवसभर सोबत राहून सहकार्य केलं त्याबद्दल गुलाबराव पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments