कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरांनी बांधली रुग्णांना राखी

          कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कोरोना ओटक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा कोरोना जन जागृती करीत लसीकरण मोहीम व्यापक रित्या राबवित आहे.  अद्यापही देखील कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोना उपाचारार्थ कल्याण डोंबिवली मनपाच्या आर्ट गँलरी कोरोना रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महिला डॉक्टरांनी राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला.
           या महिला डॉक्टरांनी कोरोना रूग्णांच्या सिस्टर बनत अनोखे भाऊ बहिणचे जिव्हाळ्याचे भावनिक नाते राखीच्या धाग्याने निर्माण झाले.  कोरोनामुळे आपल्या सख्या बहीणकडुन राखी बांधुन न घेता रक्षाबंधन साजरे करता येणार नसल्याचे दुःख या डॉक्टर बहिणीनी बांधलेल्या राखीमुळे आनंद अश्रु डोळ्यात तरळत असल्याचे त्याप्रसंगी दिसले. 
          भाऊ बहिण नात्याचा पवित्र उत्सव रक्षाबंधन मात्र इतर सणाप्रमाणे या सणावर ही कोरोनाचे सावट आहे. अनेक भाऊ बहीण हे अजून ही कोरोनाशी झुंजत कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. अश्या रुग्णांना आजच्या दिवसाचा आनंद घेता यावा म्हणून कल्याण आर्ट गॅलरी येथील  कोव्हिडं सेंटर मध्ये डॉक्टर, नर्स आणि स्टाफ ने रुग्णांसोबत रक्षाबंधन उत्सव साजरा केला. या रुग्णांना  राखी बांधून, ओवाळून हा उत्सव साजरा केला. यावेळी रुग्णांनी या सर्व डॉक्टर, नर्स, स्टाफ चे आभार ही मानले.

Post a Comment

0 Comments