पुणे-बडोदा महामार्गातील वंचित प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या आमदार विश्वनाथ भोईर यांची जिल्हाधिकाऱ्यां कडे मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आंबिवली नजीक असलेल्या बल्याणी परिसरातील प्र.क्र.११ मधील पुणे-बडोदा महामार्गातील प्रकल्पग्रस्त चाळ मालकांना अद्यापही मोबदला मिळालेला नसून या वंचित प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याची मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यादेखील पाठपुरावा करत आहेत.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र.११ बल्याणी येथून पुणे-बडोदा महामार्गाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या काही जागेत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने राज्य महामार्ग मंडळाच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली असून काही जमिन मालकांना त्या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. काही जमिन मालकांच्या जागेवर चाळी बांधलेल्या आहेत म्हणुन मोबदला स्वीकारताना चाळकऱ्यांचा मोबदला वेगळा व जमिनीमालकांना जमिनीचा मोबदला वेगळा करण्यात आला नाही. हे करण्यात यावे अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.पुणे-बडोदा महामार्ग महामार्गामध्ये बाधित असलेल्या खाजगी जागांना यापूर्वीच मोबदला दिला आहे. परंतु काही मोकळ्या जागेत शेड बांधून पी.डब्ल्यु.डीच्या अधिकाऱ्यांच्या काहींना हाताशी पुन्हा तेथे बांधकाम सुरु असल्याचा सर्वे करून संबंधितांचा भरघोस मोबदला मिळवीण्याचा विचार सुरु आहे. तरी या पत्राचा गांभीर्याने विचार करून कल्याण पश्चिम मतदार संघातील एकही प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित राहणार नाही यासाठी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


Post a Comment

0 Comments