Header AD

चार आदिवासी पाडे दत्तक घेणाऱ्या डोंबिवली तील समाजसेविका ऍड माधुरी जोशी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

   

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील समाजसेविका एॅड माधुरी जोशी यांनी २०१६ मध्ये सुधाश्रीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जोशी यांनी आदिवासी पाड्यावर काम करताना,याठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा ,औषध  आणिशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाविशेष म्हणजे त्यांनी चार  आदिवासी पाडे दत्तक घेतले असुन तेथील लोकांच्या गरजा समजुन घेवुन त्याप्रमाणे तिथे मदत करण्याचा प्रयत्न करतात.  

      आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना पुस्तके, शाळा लांब असल्याने वेळ वाचविण्यासाठी सायकली देणे, पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी प्युरिफायर देणे तसेच येथील लोकांबरोबर विविध   सण सुध्दा एॅड जोशी पाडयावरच साजरे केले.करोना महामारीच्या संकटामुळे सर्वजन हैराण झाले. सगळ्यात जास्त त्रास हातावर पोट असणाऱ्यांना झाला. एॅड जोशी या कोरोना काळात गरिबांना धान्य वाटप केले. सुरुवातीला ५ किलो कणिक, ३ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, १ लिटर तेल, मूग, मटकी, चना, असे किट दिली.

      आदिवासी पाड्यातील कोणीही उपाशी राहू नये आजही एॅड  जोशी याचे हे समाजकार्य सुरु आहे. एॅड जोशी यांनी ए समाजकार्य करताना कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही.अनेक वृत्तपत्रांनी आणि समाजिक संस्थांनी त्याच्या या कार्याच दखल घेत त्याचे कौतुक केले. एॅड  जोशी व त्याच्या मुलाचा वाढदिवस त्या नेहमी नेहमी वृध्दाश्रम किंवा गतीमंद मुलांसोबत व अनाथ मुलांसोबत साजरा करतात. 

         माझ्या या सगळया प्रोजेक्टला मला कुठलेही अनुदान मिळत नाही. मी घेत नाही. सगळे प्रोजेक्ट मी स्वतःच्या पैशाने आणि मित्र मंडळींनी केलेल्या मदतीतुन करते. त्या साठीही माझे बंधु मित्र मला सहकार्य करीतच असतात असे त्या म्हणतात. समाजात अशी माणसे आहेत म्हणून आज गरिबांच्या चेहऱ्यावरील हसू आणि आंनदाश्रू पहावयास मिळतात.डोंबिवलीतील या समाजसेविकेच्या कार्याला अनेक राजकीय मंडळीकडून कौतुकाची थाप मिळते.  

चार आदिवासी पाडे दत्तक घेणाऱ्या डोंबिवली तील समाजसेविका ऍड माधुरी जोशी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक चार आदिवासी पाडे दत्तक घेणाऱ्या डोंबिवली तील समाजसेविका ऍड माधुरी जोशी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads