फिनोलॉजी वन' अंतर्गत फिनोलॉजीने प्रीमियम सेवांची घोषणा केली■भारतातील सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांचा आर्थिक प्रवास सुलभ होण्याकरिता प्रयत्नशील ~


मुंबई, २४ ऑगस्ट २०२१ : भारतीय गुंतवणूकदारांना त्यांचा गुंतवणूक प्रवास सक्षम करत, फिनोलॉजी हा भारतातील सर्वात मोठा आर्थिक शिक्षण आणि वन-स्टॉप गुंतवणूक प्लॅटफॉर्मने फिनोलॉजी वन ही सबस्क्रिप्शन मॉडेल आधारीत प्रीमियम सेवांची एक मालिका आणली आहे. विशेषत: तज्ञांनी तयार केलेले किफायतशीर सोल्युशन- फिनोल़जी वन हे रेसिपी, क्वेस्ट आणि टिकर अशा आर्थिक प्लॅनिंग टूलचे एकत्रीकरण आहे. यामुळे यूझरचा आर्थिक प्रवास तर सुखकर होईलच, पण त्याबरोबरच त्यांना विविध साधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.     फिनोलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल कामरा म्हणाले, “भारतात आर्थिक नियोजन आणि शिक्षण विनाकारण महाग आणि गुंतागुंतीचे झाले आहे. आमच्या यूझर्सना गुंतवणुकीचा अखंड अनुभव मिळावा, अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच, त्यांना परवडेल अशा आणि अडथळाविरहीत साधनांची सुविधा आम्ही आणली आहे. फिनोलॉजी वन हे सहजपणे कुणीही वापरू शकते. वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवशिक्यापासून तज्ञांपर्यंत हे उपयुक्त आहे.        आपल्या गुंतवणूकदारांच्या आर्थिक गरजांकरिता उत्कृष्ट सोल्युशन प्रदान करण्यासाठी, यूझर्सना एक अखंड अनुभव देण्यासाठी फिनोलॉजी वन हे खूप काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे. हे एकिकृत आर्थिक नियोजक असून त्या उद्दिष्ट गुंतवणूकदारांना त्याचे चतुर तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या शिफारशींद्वारे सक्षम बनवणे हे आहे."      फिनोलॉजी वन आणि त्याच्या विशेष सुविधांच्या आगमनाद्वारे, भारतातील आर्थिक शिक्षण आणि गुंतवणूक प्रणालीत परिवर्तन होण्याची आशा फिनोलॉजीला आहे.

Post a Comment

0 Comments