केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची भेट
मुंबई दि. 26  - केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी जुहू येथील अधिश या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला. नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे.           अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून त्यांच्या या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी  नारायण राणे यांना पाठिंबा दिला. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; एम एस नंदा; प्रकाश जाधव ; आदी पदाधिकारी उपस्थित होते.


    

           नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत.त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी.  राणे यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे.असे ना रामदास आठवले म्हणाले.

Post a Comment

0 Comments