खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील नाट्य, नृत्य, तंत्रज्ञ या क्षेत्रातील कलाकार व त्यांच्या कुटुंबियांना ठाणे महानगर पालिके तर्फे लसीकरण सत्र आयोजित
ठाणे,  प्रतिनिधी : - अ. भा. मराठी नाट्यपरिषदठाणे शाखा तसेच वाद्यवृंद कलानिधी समिती ठाणे यांच्या मागणीनुसार  मा. खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यातील कलाकारांसाठी विशेष कोरोना लसीकरण सत्राचे आयोजन सोमवार दि. 23 ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत गडकरी रंगायतनठाणे येथे आयोजित करण्यात आले होते.        यामध्ये वाद्यवृंद तसेच नाट्य व न्रुत्य क्षेत्रातले कलाकारतंत्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबियांना कोविशिल्ड लस डोस देण्यात आली. ह्या उपक्रमात बहुसंख्येने संस्थेचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयानी नाव नोंदणी केली. या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाला रंगमंच कामगार ह्यांचा सर्वांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद लाभला.           कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  उप महापौर पल्लवी कदम,  गटनेते दिलीप बारटक्केनगरसेविका मा. नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारेअ. भा. मराठी नाट्यपरिषदठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकरउपाध्यक्ष दुर्गेश अकेरकरकार्यवाहक नरेंद्र बेडेकरनिशिकांत महाकाळआदित्य संभुसप्रतीक जाधवप्रदीप भावेनट्य परिषद प्रसिध्दी प्रमुख श्रृतिका कोळी मोरेकर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments