१५५ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
कल्याण , कुणाल  म्हात्रे :संतनिरंकारी मिशनच्या वतीने रविवारी लोकनेते रामशेठ ठाकूर न्यू इंग्लिश स्कूलकामोठे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात  ९४  तर मागील रविवारी संत निरंकारी सत्संग भवनगणेश नगरकांदिवली येथील शिबिरात  ६१  अशा एकूण१५५ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलेसंत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलन केले.कामोठे येथील शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांनीकेले.यावेळीआमदारठाकूर यांनी मिशनच्या लोकहितवादी निष्काम सेवेचे कौतुक केलेपनवेल नगर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉअरुण भगत यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. तर कांदिवली येथील शिबिराचे उद्घाटन स्थानीय सेवादल क्षेत्रीय संचालक मुकुंद देवे यांनी केले.सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित या दोन्ही शिबिरांचे उत्तम नियोजन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजकमुखीसेवादल अधिकारी आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांनी मिळून सुंदर प्रकारे केले.


Post a Comment

0 Comments