स्वातंत्र्यदिनी कल्याण - डोंबिवलीत धावणार 'तेजस्विनी'


■परिवहनच्या ताफ्यात महिलांसाठी चार बस दाखल परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्या प्रयत्नांना यश....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात महिलांसाठी चार 'तेजस्विनी बस दाखल झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टपासून या बसेस प्रवासी सेवेत दाखल होतील. या बसेससाठी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.महिलांसाठी कल्याणला दोन आणि डोंबिवलीत दोन बसेस धावतील. मुंबईनवी मुंबईठाणेपुणेनागपूर आणि कल्याण-डोंबिवली पालिकेसाठी शासनाने २०१७ मध्ये तेजस्विनी बस मंजूर केल्या. केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे ८० टक्के निधी 'तेजस्विनी प्रकल्पासाठी देणार होतेतर २० टक्के हिस्सा संबंधित पालिकेचा होता. यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी चार बसेस मंजूर केल्या. यासाठी शासनाने १ कोटी २० लाखांचा निधीही मंजूर केला. यानंतर बसेस खरेदीसाठी येणाऱ्या खर्चास वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरीही महासभेने दिली.आता प्रत्यक्ष या बसेस केडीएमटीच्या ताफ्यात आल्या असून १२ महिला या बसचे सारथ्य करणार आहेत. त्यांना गणेशघाट आगारात प्रशिक्षणही दिले आहे. १५ ऑगस्टला किंवा तत्पूर्वीसुद्धा बस सुरू होतीलअशी माहिती प्रशासनाने दिली. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांपासून सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या कालावधीत फक्त महिलांसाठी या बसेस निवासी भागात धावतील.शिवसेनेचे मनोज चौधरी परिवहनचे सभापती झाल्यानंतर तेजस्विनी बससाठीच्या पाठपुराव्याला वेग आला. चौधरी यांच्याच पुढाकाराने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि प्रत्यक्षात बस रस्त्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला. डोंबिवली निवासी भागलोढा-पलावाकल्याण रिंग रोडमोहने या मार्गावर महिला प्रवासी अधिक असल्याने सुरुवातीला या मार्गावर या बस धावतील.महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या तेजस्विनी बस असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या बसची रचना करण्यात आली आहे. तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेराजीपीएस प्रणाली तसंच पॅनिक बटन देखील असणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments