आत्मविश्वास प्रतिष्ठाणची कोकणातील २५० कुटुंबियांना मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आत्मविश्वास प्रतिष्ठाणने कोकणातील पूरग्रस्त २५० कुटुंबियांना मदत करत सामजिक बांधिलकी जपली आहे.  महाड आणि चिपळूण पूरग्रस्तांनाना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील  गायकवाड वाडी येथील आत्मविश्वास प्रतिष्ठाण नेहमी प्रमाणे पुढे येऊन रविवारी चिपळूण येथील पेठमाप च्या २ वाडी, शंकरवाडी, गोवळकोटमजरे काशी आणि बायपास या गावा मध्ये गेले होते. यावेळी पूरग्रस्तांना तांदुळ,गव्हाचे पिठ,तेल,साखरमिठतूर डाळ ,मूग डाळ,कांदेबटाटेबिस्कीटचहा पावडरफरसाण,पाणी बिसलेरी बॉक्स,सॅनिटरी पॅड, मेणबत्ती,  माचीसनॅपकिनमास्ककपडे आदी वस्तूंचे किट बनवून २५०  कुटुंबाना मदत केल्याची माहिती आत्मविश्वास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अक्षय गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments