मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी - नरेंद्र पवार

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जर स्वातंत्र्याचा 'अमृतमहोत्सव की 'हीरकमहोत्सव आहे हे माहिती नसेल तर हा देशाचा अपमान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील 'जन आशीर्वाद यात्रेलामिळणाऱ्या प्रतिसादाला घाबरून पोलीस बळाचा गैरवापर करीत नारायण राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली गेली. भरल्या ताटावरून त्यांना उठवत अटक करण्यात आली. राज्यातील भाजपा कार्यालयांवर भ्याड हल्ले केले गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री युवासैनिकांचे कौतुक करत असतील तर महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे याकडेही पवार यांनी लक्ष वेधून,  ही कसली शिवशाहीहे तर तालिबानी राज्य आहे महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा सुपडा साफ होणार आहे असे सांगितले.देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या  बलिदानाचा हा अपमान आहे असे सांगत त्यांच्या आत्म्यास आज काय वाटत असेल असाही सवाल नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  इतकी तत्परता मुख्यमंत्र्यांनी महापूरराज्यातल्या समस्याशेतकरीमराठा आरक्षण आणि खंडणीखोर गुंडांना पकडण्यासाठी  दाखवली असती तर जनतेने त्यांची दृष्ट काढली असती. यापुढे कोणत्याही भाजपा कार्यकर्त्यांस त्रास देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यास जशास तसे उत्तर दिले जातील असाही इशारा नरेंद्र पवार यांनी दिला आहे.दरम्यान भाजपा कल्याण शहर कार्यालयावर हल्ला करणारे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर व कल्याण शहर प्रमुख बंड्या साळवी यांच्याशी निकराने लढा देणारे भाजपा पदाधिकारी प्रताप टुमकरचे नरेंद्र पवार यांनी कौतुक करून अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments