दोन वर्ष उलटली विधान सभेत जाऊन, एकतरी विकास कामे झालेली दाखवा


 

 शिवसेनेचा पत्रकार परिषदेत मनसे आमदारांना टोला...


 

डोंबिबली शंकर जाधव ) डोंबिवलीतील विकास कामे शिवसेनाच करू शकते.शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आले होते.खासदारांच्या या कामाचे श्रेय मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील हे लाटत आहे.खासदार डॉ.शिंदे यांची विकास कामात दूरदृष्टी असून त्यांनी आजवर अनेक विकास कामे करून दाखवली आहेत.
      जे आमदार खासदारांच्या कामांचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करत आहेत, त्या मनसेच्या आमदाराला विधानसभेत जाऊन दोन वर्ष उलटली असून त्यांनी एकतरी विकास कामे झालेली जनतेला दाखवा असा टोला पत्रकार परिषदेत शिवसेनेने लगावला.


  

     पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात याविषयावर शिवसेना तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ बोलत होते. यावेळी डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरेजेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रेयुवा अधिकारी दिपेश म्हात्रेराजेश कदमतालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रेएकनाथ पाटीलयोगेश म्हात्रे आदि उपस्थित होते.
        सुरुवातील प्रकाश म्हात्रे म्हणाले, कामे केली की जनता लक्षात ठेवते. आम्ही श्रेयासाठी काम करीत नाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकास कामांसाठी पाठपुरावा करून ३६० कोटींचा निधी आणला आहे. २७ कोटी निधीवरून कोणी एकट्याने निधी आणला नसून शासनानेही दोघांच्यामुळे हे काम होत आहे असे स्पष्ट केले आहे. 
     त्याबाबतची प्रत प्रकाश म्हात्रे यांनी दाखवली. पण त्यात एडिट करून फक्त मनसे आमदारांनी स्वतःच नांव दाखवलं असा आरोप म्हात्रे यांनी केला. आमदार प्रमोद ( राजू ) राजू पाटील यांनी एक तरी काम स्वतःच्या ताकदीने आणलं आहे का येथील जनता दुधखळी नाहीतर राजेश मोरे म्हणालेयेथील लोकप्रतिनिधी आपल्या नावाने श्रेय घेत आहे ते योग्य नाहीमी केलं मी केलं हे बरोबर नाही. 
   तर यावेळी थरवळ पुढे म्हणालेसरकारी लाखोट्यात विरोधक खाडाखोड करून मीच पाठपुरावा केला असे सांगतात पण अशी खोडखोड केल्या प्रकरणी तक्रार करणार.आधी केले नंतर सांगितले ही शिवसेनेची भूमिका आहे.  माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ४७१ कोटी रुपये निधीच्या रस्ते होणारं म्हणून भूमिपूजन केले होते, पण प्रत्यक्षात चार कोटींची कामे झाली नाही असा आरोप केला तर काहींना हौस असते मीच मीच केलं असं सांगाण्याची अशी टीका आमदारांवर केली. 
      पुढे रमेश म्हात्रे यांनी मनसे आमदार पाटील हे निष्क्रिय आमदार असल्याचा टोला लगावला.ते पुढे म्हणाले, आज कोरोना परिस्थिती आहे म्हणून आमदार  पाटील डोंबिवलीत  दिसत आहेत नाहीतर ते देशाबाहेर असते.  तर दीपेश म्हात्रे म्हणालेआमदार राजू पाटील व रवींद्र चव्हाण यांनी कोविड सेंटर बंद करा म्हणून सांगितले होते, मात्र दुसरी लाट आली तेव्हा ते कुठे होते.

      सिमेंट काँक्रीट रोडसाठी मंजुरी नव्हती मग भूमीपूजन कशी केलीत. राजेश कदम म्हणालेप्रथम आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी पेट्रोल-डिझेल वाढीबाबत पत्र द्यावेत नंतर श्रेयासाठी प्रसिद्धी करावी असे यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments