तरुणांकडून १० ते १२ दुचाकी, चारचाकी गाड्यांची तोडफोड
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रात्री दोनच्या सुमारास कल्याण पूर्व भागातील चिकणीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत परिसरात आले. हे दोघे एका तरुणाच्या शोधात होते.              तो सापडला नाही म्हणून या दोघांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना निशाणा केला. बाईककाररिक्षांची तोडफोड केली.             एका तरुणाला जखमी देखील केले. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत. अखेर दहशत माजविणारे हे दोन तरुण कोण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments