Header AD

ईव्हीएम मशीन हॅक प्रकरणी शिवसेना आक्रमक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना ईव्हीएम मशीन हॅक करून निवडून आणल्याच्या हॅकरच्या दाव्याला आता राजकीय वळण आले असून शिवसेनेने या प्रकरणात उडी घेत  ईव्हीएम मशीन मध्ये मतांचा फेरफार प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार धनंजय बोडारे यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कल्याण पूर्वसह संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.          विधान सभेच्या निवडणुकीत कल्याण पूर्वे विधान सभा मतदार संघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना ईव्हीएम मसीन हॅक करुन निवडणूक जिंकुन दिल्याचा दावा करणाऱ्या  एका हॅकरचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी कल्याण पूर्वे विधान सभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हॅकरने आपल्याला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करीत हॅकर विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली होती.  पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.           हॅकरच्या ईव्हीएम हॅक करून गायकवाड यांना निवडून आल्याच्या दाव्याला आता चांगलेच राजकीय वळण आले असून या ईव्हीएम मशीन मधील  मतदान फेरफारीच्या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून भाजपा आमदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार धनंजय बोडोरे व अन्य शिवसेनेच्या पदाधिकार्यानी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी भेट घेत या घटनेची सखोल चॉकशी करून आमदार गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले आहे.
ईव्हीएम मशीन हॅक प्रकरणी शिवसेना आक्रमक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट ईव्हीएम मशीन हॅक प्रकरणी शिवसेना आक्रमक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट Reviewed by News1 Marathi on August 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads