कल्याण मधील अपंग व पोलि ओग्रस्तांसाठी जिजाऊ संस्था बनली आधारवड

 

■निलेश सांबरेंच्या जिजाऊ संस्थेची सामाजिक क्षेत्रात चौफेर कामगिरी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  जिजाऊ संस्थेच्यावतीने पार पडलेल्या अपंग व पोलिओग्रस्तांसाठीच्या शिबिरामध्ये ११८  लोकांनी सहभाग नोंदविला होता. त्यांपैकी ७८ जणांना  विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप टिटवाळा मधील युवा समाजसेवक संदीप तरे यांच्या पत्नी रजनी तरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.यावेळी कॅलिपर्सव्हीलचेअरकुबडी,जयपूर फूट,वॉकर,इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री तरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणसंदीप तरे युवा समाज सेवकभगवान सुरोशी अध्यक्ष आधार अपंग कल्याणकारी संस्था, रविंद्र जाधव, कैलास धुमाळ, अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ पाटोळे, चेतन सुरोशी, सुरज जाधव व जिजाऊ कल्याण टीमने विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments