Header AD

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   : ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिर हॉल, मुलुंड येथे शनिवारी प्रथमच अल्टिमेट मुंबई विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टिटवाळ्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत यश मिळविले आहे.
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू खेळाच्या सरावापासून व स्पर्धे पासून वंचित होते. परंतु तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात शासनाने नेमून सर्व नियमांचे पालन करून विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विभागातील सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे गौरी तिटमेमृण्मयी भोजणेयश राठोड आणि भुषण जाधव हे ४ खेळाडू देखील या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत या खेळाडूंना अनुक्रमे गौरी तीटमे - सुवर्ण पदकमृण्मयी भोजने - रौप्य पदकभुषण जाधव - रौप्य पदकयश राठोड - सहभाग असे १ सुवर्ण२ रौप्य पदके प्राप्त झाले. या स्पर्धेत राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांनी पंच म्हणून कार्य केले.          ऑलिंपिक खेळाच्या पार्श्व भूमीवर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी होऊन नक्कीच पुढील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना सहभागी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेचे आयोजक व ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिशनचे अध्यक्ष मोहन सिंग आणि सचिव संजय कटोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads