जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांचे एक कोटी घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक





डोंबिवली ( शंकर जाधव ) शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो असे आमिष दाखवून अनेकां कडून पैसे घेऊन पसार झालेल्या भामटय़ाला डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी यूपीच्या गाझियाबाद येथून अटक केली आहे. चंकेश जैन (२५ )असे या भामट्याचे नाव असून त्याने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आज कल्याण न्यायालयाने त्याला १४  ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



      मिळालेल्या माहितीनुसार, चंकेश जैन हा तरुण डोंबिवली पूर्व  बालाजी मंदीर रोड  परिसरात राहायचा .चंकेशने अनेक जणांना मी शेयर बाजारात गुंतवनुक करतो तुमचे पैसे शेयर बाजारात गुंतवा मी तुम्हाला ८ ते १० टक्के व्याजाने पैसे परत करतो असे आमिष दाखवले . त्याच्या या जादा व्याजाच्या आमिषाला भुलून अनेक जणांनी चंकेशला पैसे दिले .



         गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदला दिला . अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली .त्यानंतर मात्र तो अचानक बेपत्ता झाला. चंकेशचा फोन लागत नव्हता त्याने दिलेल्या पत्त्यावर देखील राहत नव्हता.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 



         पोलिसांनी चंकेशला शोधण्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलीस नाईक संदीप खाडे आणि अशोक करमोडा यांचे पथक नेमले. 



         याच दरम्यान पोलीसांना चंकेशचा मोबाईल नंबर मिळाला याच नंबरच्या आधारे तपास करत उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे लपून बसलेल्या चंकेशला अटक केली .आत्तार्पयत त्याने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे  उघड झाले असून त्याने आणखी किती लोकांना फसविले आहे याचा शोध टिळकनगर पोलिस करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments