२७गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण ग्रामीण मध्ये असलेल्या २७ गावांच्या समस्या जैसे थे तैसे आहे. अनेक सरकारे आले पण २७ गावच्या समस्या सुटल्या नाहीत२७ गावातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्यसेवा,कचरा आदी मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने या समस्यां सोडविण्यासाठी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्तांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली.          कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत कल्याण ग्रामीण भागातील २७ गावांचा समावेश करून तब्बल सहा वर्षांचा कालावधी लोटला तरी सत्तावीस गावातील नागरिकांना मूलभूत नागरी समस्यां पदरी पाडून घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पालिकेत गावे समाविष्ट होऊनही पालिका प्रशासनाने गावातील रस्ते, पाणी, कचरा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून हाथ आखडता घेतला जात  आहे.            यामुळे या गावातील नागरिकानां भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व समस्यां सोडविण्यासाठी  सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकार्याच्या शिष्ठा मंडळाने  पालिका मुख्यालयात धाव घेत समितीचे पदाधिकारी गुलाब वझे,गंगाराम शेलार,गजानन मंगरूळकर,विजय भानेरंगनाथ ठाकूर,बळीराम भाने,वासुदेव गायकर,विश्वनाथ रसाळ  आदींनी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. तसेच 27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा अशी मागणी केली. जेणे करून लोकांच्या समस्या जाणून घेता येतील आणि त्यातून समस्या सुटण्यास मदत होईल.महाराष्ट्र शासनाने 2015 साली जबरदस्तीने येथील 27 गावे कडोंमपात समाविष्ट केली आहेत. मात्र 27 गावांतील जनतेला स्वतंत्र नगरपालिका हवी आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मागील कित्येक वर्षांपासून येथील जनतेला किमान पायाभूत सुविधाही पुरविण्यास असमर्थ ठरली आहे. आजतागायत ह्या परिस्थितीत सुधारणा झाली नसून महानगरपालिकेच्या अंमलाखाली आजही येथील जनता पायाभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे.एकंदरीत अशी परिस्थिती असल्याने हि गावे कडोंमपातून मुक्त करुन स्वतंत्र नगरपालिका मिळावी ह्यासाठी संघर्ष समितीने लढा पुकारला आहेतरी याला काही काळ लोटला आहे. तरी महापालिकेकडून मूलभूत सोयीसुविधा मिळावी या हेतूने 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट घेतली असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले की.

Post a Comment

0 Comments