आप आपसातील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले पाहिजे - आमदार किसन कथोरे

    

       कल्याण , कुणाल म्हात्रे  :  आप आपसातील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांनी म्हसकळ येथील कार्यक्रमात केले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी अरुण पाटील यांची निवड झाल्याने कल्याण तालुका ग्रामीण भाजपच्या वतीने भव्य सत्कार कार्यक्रम व युवा मोर्चा, महीला आघाडी, ओबीसी मोर्चा पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष चंदू बोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  

                                


          भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार मुर्ती अरुण पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच शेतकरी संघटनासेवा सोसायटीग्रामपंचायत सरपंचभाजपा कार्यकर्ते यांनीही सत्कार मुर्ती अरुण पाटील यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा महिला आघाडीओबीसी मोर्चा, युवा मोर्चा यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.    यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री पदाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय पंचायतराज मंत्री पदी नियुक्ती केली आहे.  तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी अरुण पाटील यांची निवड झाली आहे. कल्याण तालुक्याला उपाध्यक्ष पदाचा मान पहिल्यांदा मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून काम केले पाहिजेसंघटना वाढवली पाहिजेचमचेगिरी पासून दूर राहिले पाहिजेगावचे भांडण गावातच मिटविले पाहिजे असे आवाहन केले.   तर सत्कार मुर्ती व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या आशीर्वादाने व आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठबळ असल्यानेतसेच शेतकरी सेवा सोसायटी यांनी सहकार्य केल्याने मी संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी झालो. माझी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुर्वी कल्याण किंवा डोंबिवलीला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा मान मिळत असेपरंतु ती प्रथा मोडून काढली आहे.  शेतकऱ्यांना  विविध योजनांचा फायदा मिळवून देईन बँकेच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले.       यावेळी  कार्यक्रमाला आमदार किसन कथोरेसत्कार मुर्ती अरुण पाटीलबाजार समितीच्या संचालिका विधा पाटील भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकरमहिला जिल्हा अध्यक्ष शितल तोंडळीकरसंचालक रवींद्र घोडविंदेप्रकाश भोईरयोगेश धुमाळओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदेकिसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जयराम भोईर भाजपा तालुकाध्यक्ष चंदू बोस्टेयुवा मोर्चा अध्यक्ष देवीदास चौधरी,  ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल धुमाळमहीला अध्यक्षा प्रिती राऊतजिल्हा परिषद सदस्य रेश्मा मगरजिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरीजगन्नाथ शेलके,  मुरलीधर चौधरीचिंतामण मगरउपाध्यक्ष मंगेश शेलारउद्योगपती दिनेश कथोरेशेतकरी संघटनेचे अशोक भोईरभगवान कोर,भाऊ सुरोशीदिनेश तारमाळेयशवंत दळवी आदींसह भाजपा  कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments