कोरोना समुपदेशन समितीच्या वतीने नागरिकांचे लसीकरण

 कल्याण ,कुणाल  म्हात्रे  : कोरोना समुपदेशन समिती आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने  लसीकरण शिबिर राबवण्यात आले.  नागरिकांची मोठया प्रमाणात असलेली मागणी आणि लसीचे असलेले महत्त्व लक्षात घेता कोरोना समुपदेशन समितीने पालिकेला सहकार्य करून कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील पुण्यार्थी सर्व्हिसिंग सेंटर येथे लसीकरण शिबिर राबविले.        पुण्यार्थी क्रिएटिव्ह वर्ल्ड हया संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पुण्यार्थी यांच्या हस्ते हया शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  शिबिरास पुण्यार्थी क्रिएटिव्ह वर्ल्ड हया संस्थेने देखिल सहकार्य केले. या शिबिरात २१७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिल काकडे व प्रथमेश पुण्यार्थीमेहुल पुण्यार्थीएकनाथ जाधवसचिन देशमुखहंसराज घोलप,  गंधर्व घोलपरिषी घोलपशकुंतला रायसुषमा सहस्त्रबुद्धेप्रज्ञा पुण्यार्थीनेहा पुण्यार्थीजिग्ना ठक्कर आदींनी परिश्रम घेतले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Post a Comment

0 Comments