स्वातंत्र्य दिना निमित्त ट्रेलची ‘आझाद हो आझाद रहो’ मोहीम


स्वातंत्र्याची भावना साजरी करण्यासाठी स्वातंत्र्य गीत लॉन्च केले ~


मुंबई, १३ ऑगस्ट २०२१ : भारताचा सर्वात मोठा लाइफस्टाईल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म, ट्रेल आपल्या #आझादहोआझादरहो या नवीन उपक्रमासह स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या मोहिमेच्या मदतीने आपल्या यूझर्सपर्यंत, त्यांना बांधून ठेवणार्‍या कोणत्याही शृंखलेतून मुक्त होण्याचा, आझाद होण्याचा संदेश पोहोचवण्याची ट्रेलची इच्छा आहे.      या प्रसंगी ट्रेलने एक स्वातंत्र्य गान लॉन्च केले आहे, जे युवा भारताची संवेदना व्यक्त करते. या गाण्यात #आझादहोआझादरहो ही सदिच्छा ठळकपणे आणि अभिमानाने व्यक्त करणारे शब्द आहेत. या व्हिडिओमध्ये रॉक आणि हिपहॉपचे भारतीय कलाकार ईपीआर अय्यर आणि जी जे स्टॉर्म दिसत आहेत आणि ट्रेलचे समर्थक त्यांना नकारात्मक विचारांच्या आणि सामाजिक साच्यांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसत आहेत.      या प्लॅटफॉर्मवरून ट्रेलचे समर्थक लोकांना मुक्तपणे अभिव्यक्त करण्यासाठी आणि या गाण्याला एक वेगळाच रंग देऊन आपली स्वतंत्र आवृत्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

Post a Comment

0 Comments