शहाड स्टेशनवर महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला अटक


चोरीला गेलेला मुद्देमाल शोधण्यासाठी सहा दिवसा पासून पोलीसांचा  चिखलात शोध सुरू...कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   शहाड स्टेशनवर महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे मात्र चोरीला गेलेला मुद्देमाल शोधण्यासाठी सहा दिवसापासून पोलीसांचा  चिखलात शोध सुरू आहे.            मुंबईत काम करणारी एक महिला काही कामानिमित्त शहाडच्या रेल्वे स्थानकावर शनिवारी आली होती. इतक्यात एक तरुण या महिलेजवळ आला. त्याने या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान पाहून या महिलेने जोरदार प्रतिबंध केला.
           मात्र तरीही या महिलेचा मोबाईल हिसकावून लुटारूने पळ काढला. या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. अशाही परिस्थितीत तिने पाठलाग करत जखडून ठेवल्याने लुटारूची ताकद क्षीण झाली. हा प्रकार पाहून काही प्रवाश्यांनी या लुटारूला पकडून पोलिसांच्या हवाली केले. 
      शाहरुख गफूर शेख असे या लुटारूचे नाव असून त्याच्यावर कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मात्र या महिलेचा मोबाईल आणि दागिने अद्याप सापडले नसून  मुद्देमाल शोधण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून पोलीस आरोपीची पोलीस कस्टडी घेत असून आरोपीने मुद्देमाल चिखलात फेकल्याचे सांगितल्याने गेल्या सहा दिवसा पासून कल्याण जीआरपी पोलीस हमालाच्या  साह्याने नाल्यात व चिखलात शोध घेत असून चोरीस गेलेल्या दागिन्यांसह मोबाईल कधी मिळेल याची वाट पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments