Header AD

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस कामाला सुरूवात झाली असून यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी रेल्वेने बंद केलेले मुख्य तिकीट घरासमोरील व एस.टी. स्टॅण्ड समोरील होम फ्लॅटफॉर्म नं.१ येथील दोन रिक्षा स्टॅण्ड तात्पुरत्या स्वरूपात तातडीने सुरू करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह संघटनेच्या प्रतिक पेणकरजितु पवारसंतोष नवलेबंडु वाडेकरजगन्नाथ भागडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील बंद रिक्षा स्टॅण्डची पाहणी केली.   कल्याण स्टेशन परीसरात स्मार्टसिटी अंतर्गत सॅटीस उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात झालेली आहे. या कामामुळे स्टेशन परीसरात प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुक नियोजनउपाययोजनानिर्णय न घेतल्यास संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुककोंडीमुळे प्रवासी नागरीकांना अनेक समस्या व असुविधा तक्रारी निर्माण होतील. वाहतुक कोंडी विरहीत वाहतुक व्यवस्था याकरीता नियोजन व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.या संदर्भात १२ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन प्रबंधक कल्याण यांच्या दालनात रेल्वे डायरेक्टरइतर अधिकारी रेल्वे पोलिसरिक्षा संघटनेचे पदाधिकारी व वाहतुक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सॅटीस काम दिलेल्या मुदतीत होण्यासाठी ववाहतुक व्यवस्था नियोजन याकरीता आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करणेएकेरी वाहतुक व्यवस्थानो एण्ट्री करणेतसेच स्टेशन समोरील रिक्षांची गर्दी कमी करण्याकरीता रेल्वेने नियोजित मॉल प्रवाशी सोयीसुविधा प्रकल्प या करीता बंद केलेले दोन रिक्षा स्टॅण्ड सद्यस्थितीत रिकामी असलेली रेल्वे हद्दीतील जागा तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा स्टॅण्ड करीता तातडीने दयावी अशी मागणी करण्यात आली.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची मागणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची मागणी Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads