डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यासाठी अभिवादन सभा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली. या दुःखद घटनेला आज 8 वर्षे पूर्ण झाली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात होणाऱ्या अक्षम्य दिरंगाई बाबत शासनाकडे दाद मागण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारीतहसीलदार यांचे मार्फत प्रधानमंत्रीमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली तसेच निदर्शनेनिषेधअभिवादन सभा घेण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील सावित्रीबाई फुले वाचनालय कल्याण येथे अभिवादन सभा घेण्यात आली.पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंतांचे खून होऊन त्याच्या तपासात दिरंगाई होते हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाहीयासाठी आपण सर्वानी मिळून संघटीतपणे सर्व पातळीवर लढायला हवं असे मत पत्रकार किरण सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच  डॉ. दाभोलकरकॉम्रेड गोविंद पानसरेडॉ कलबुर्गीगौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासात  वारंवार पाठपुरावा करून देखील इतका वेळ लागत असेल तर  सर्वसामान्य माणसाला आयुष्य जगणं कठीण होऊन बसेल. त्यासाठी सामाजिक राजकीय पातळीवर लढा कायम चालू ठेवावा लागेल असे मत व्यक्त केले. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्र अंनिसने कोणत्याही प्रकारे हिंसात्मक मार्ग न अवलंबता शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने लढा चालू ठेवला आणि हा लढापाठपुरावा पुढेही चालू ठेवू असा निर्धार केला. यावेळी शैलेश दोंदेबंडू घोडेउदय चौधरीसुधीर चित्तेडॉ. सुषमा बसवंतडॉ बी एस वाघउत्तम जोगदंडयांनी देखील तपासाबाबतची खंत व्यक्त केली. तसेच अंनिस कल्याण, डोंबिवलीभिवंडीटिटवाळा शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अभिवादन सभेचे सूत्र संचालन जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी तर प्रास्ताविक किशोर पाटीलआणि आभार प्रदर्शन तानाजी सत्वधीर यांनी केले.

Post a Comment

0 Comments