व्यसन मुक्तीवर जन जागृती करणाऱ्या गेस्ट शॉर्ट फिल्मचं उद्घाटन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  प्रत्येक व्यसन हे पाहुण्यासारखं असतं. जसा आलेला पाहुणा एक ना एक दिवस निघून जातो. तशाच पद्धतीने आपल्याला जडलेले व्यसन हे एका टर्निंग पाँईटला आपल्याला सोडून जाते. फक्त आपल्याला ते समजावणारं किंवा समजावून देणारं योग्य माणूस भेटणं गरजेचं असतं. असा उत्तम संदेश गेस्ट लघुचित्रपट देत आहे असे प्रतिपादन भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निलम पाटील यांनी गेस्ट शॉर्ट फिल्मच्या उद्घाटन प्रसंगी काढले.माणूस जीवनामध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतोशिक्षण देतो. कधी तरी चुकीच्या संगतीने माणसाला दारूचे,  तंबाखूगुटखापानविडीसिगारेट पिण्याचं व्यसन जडत. तेव्हा कोणीतरी त्याला सांगतो की, 'बाबा रे हे व्यसन सोड या व्यसनामुळे शरीराची हानी होते.परंतु सदरची व्यक्ती मात्र 'आपल्याला ही सवय लागलेली आहे ती आता सुटणार नाही.असं सांगत फिरत असतो. परंतु जेव्हा हेच व्यसन स्वतःच्या  मुलाला लागते तेव्हा मात्र ती व्यक्ती भानावर येते आणि आपले व्यसन सोडायला तयार होते. अशा आशयाची "गेस्ट" नावाची शॉर्ट फिल्म लेखक-दिग्दर्शक अजय पाटील यांनी साकारली आहे.या फिल्म चे निलम पाटील यांनी कौतुक करून अत्यंत उत्तमपणे विषय सादर केल्या बद्दल अजय पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी गेस्ट शॉर्ट फिल्म चे उद्घाटन निलम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले यांनी या लघुपटाला शुभेच्छा देऊन तंबाखू मुक्ती झालीच पाहिजे असे मत नोंदवले. या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र झावरेवैशाली डोंगरे, सुरेखा भोईकेंद्रप्रमुख प्रिया पाटीलप्रबुद्ध गायकवाडधनराज चव्हाणअशोक डुकले,रमेश शेरेशिक्षक संघटना अध्यक्ष महेंद्र पाटीलधिरज भोईर उपस्थित होते.या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन अजय लिंबाजी पाटील यांनी केले आहे. तर या लघुपटात रवींद्र तरेअजय पाटील हे मुख्य कलाकार असून बालकलाकार म्हणून वेदिका तरेनिशांत जाधवसान्वी जाधव,  संग्राम भोईरदक्ष जाधव यांनी अभिनयाची छाप सोडली आहे. कँमेरा - सुयश काळे,अभिषेक तरेहेमंत शिंदेएडिटिंग - आकाश पाटीलसंगीत - आदर्श पाटील यांचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments