नवी मुंबई विमान तळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्यासाठी डोंबिवलीत मशाल मोर्चा

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी कल्याण ग्रामीण डोंबिवली ग्रामीण भागात देखील या मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.           डोंबिवली मानपडेश्वर मंदिर येथे मशाल पेटवून  या मशाल मोर्चा काढण्यात आला. शेकडोंच्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र झेंडे व फलक घेऊन या मशाल मोर्चात सहभागी झाले असल्याची माहिती गुलाब वझे यांनी दिली.         विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमि पूत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी 10 जून रोजी मोठे जनआंदोलन केले होते. तर 24 जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला.          नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास 15 ठिकाणी मानवी साखळी केली होती.          100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात  आला असल्याची माहिती गुलाब वझे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments