राजे गृपचा चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा
कल्याण , कुणाल  म्हात्रे :  राजे ग्रुप टिटवाळाब्रदर्स ग्रुप कल्याण आणि सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू जमा करून नुकत्याच  चिपळूण तालुक्यात पाठवण्यात आल्या.


गेल्या १०  दिवसांपासून टिटवाळावासिंदकल्याण या परिसरातील नागरिकांना चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू दान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या सभासदांकडे जमा केल्या. दोन दिवस संस्थेचे कार्यकर्ते सर्व साहित्य एकत्र करून प्रत्येक कुटंबाला देण्यासाठी पॅकेट्स तयार करत होते. १  टेम्पो भरून जीवनावश्यक वस्तू चिपळूण येथे रवाना करण्यात आल्या.संकटात असलेल्या आपल्या कोकणी बांधवांसाठी मदतीचा छोटासा प्रयत्न प्रत्यक्षात कोकणात जाऊन करण्यात आला असल्याचे राजे गृपचे महेश ऐगडे यांनी सांगितले. टिटवाळयातील राजे ग्रुपब्रदर्स ग्रूपबल्लाळेश्वर सोसायटीअमृतसिद्धी संकुलसिद्धीविनायक युवा संस्थागणेश गायकवाडनवाशेठ भोयराजन जोशीअमित राममानेमनोहर सरनोबत यांच्या वतीने हि छोटीशी मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments