स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर देखील आदिवासी पाडे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचितच

  

■आदिवासी क्षेञ आढावा समीतीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली आदिवासी पाड्यांची पाहणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर देखील आदिवासी पाडे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचितच असून  आदिवासी क्षेञ आढावा समीतीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी कल्याण तालुक्यातील आदिवासी पाड्यांची पाहणी केली.  कल्याण तालुक्यातील खडवाली, जिभोणी, कातकरीपाडा, वाव्होली, सागवाडी, मानिवली कातकरीपाडानेतीवली कातकरीपाडा या ठिकाणी पाहाणी दौरा करून आदिवासी जमातीतील कातकरी कुंटुबांची नागरी सुविधांबाबत चौकशी केली. यावेळी देशाच्या स्वांतञ्याच्या ७४वर्षानंतर खरे स्वांतञ्याची किरणे गरीबांच्या झोपड्डी पर्यंत पोहचलेली नाही. अनेक आदिवासी कुंटुबांना घरकुल नाही, शुध्द पिण्याचे पाणी नाही, आधारकार्ड नाही, रेशनकार्ड नाही हे सर्व कातकरी कुंटुबांना मिळाले पाहीजे. या बाबत शासनाने ठरवुन दिलेल्या योजनांची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापुर प्रकल्प आधिकारी आर.एच.किल्लेदार, तहसिलदार दिपक आकडे, गटविकास आधिकारी श्वेता पालवे, महिला व बालविकास प्रकल्प आधिकारी चौधरी,  खडवली, नंडगाववाव्होली सजा तलाठी मंडळ आधिकारी सांळुखे, संबधित ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक, केडीएमसी प्रभाग क्षेञ आधिकारी व कर्मचारी, श्रमजीवी  संघटनेचे पदाधिकारी जि.अध्यक्ष  आशोक सापटे, जि.सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, ता.अध्यक्ष विष्णु वाघे, उपाध्यक्ष ज्योती फसाले, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे आदीजण दौ-या दरम्यान उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments