Header AD

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शकोत्तर वर्षात पदार्पण केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासुन समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालायं. या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाच्या हाताचे ठसे टिटवाळा येथील संस्कृती संग्रहालयात संग्रहीत करण्यात आले असून ते सगळ्यांनाच पहायला मिळणार आहेत. गेली ७ दशकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा बाबासाहेब पुरंदरे कधी शिवचरीत्राच्या माध्यमातुन तर कधी जाणता राजा महानाट्यातुनकधी व्याख्यानातुन तर कधी शिवकल्याण राजाच्या  माध्यमातुन जागर करताहेत. शुक्रवारी संस्कृती संग्रहालयटिटवाळासाठी याच शिवशाहिरांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. पुण्याला बाबासाहेबांच्या निवासस्थानी मुर्तीकार प्रशांत गोडांबेसंस्कृती संग्रहालयाचे संचालक अविनाश हरडसंकल्पक युवासेना पदाधिकारी ॲड. जयेश वाणी व संग्रहालयाच्या कायदेशिर सल्लागार दिव्या ठाकुर यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या हाताचे ठसे आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.श्रीमहागणपतीच्या टिटवाळा या पावन नगरीत संस्कृती संग्रहालय आकाराला येत आहे. याच संग्रहालयात महारष्ट्राच्या समाजकारणातकलाक्षेत्रातक्रिडाक्षेत्रातधार्मिकक्षेत्रात व राजकारणात महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिंच्या हातांचे ठसे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा म्हणुन संवर्धित करण्याचे काम सुरु आहे. जगातील या एकमेव अशा प्रकारच्या संग्रहालयात आता बाबासाहेबांचे प्रेरणादाई हात सगळ्यांनाच पहायला मिळतील.

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल Reviewed by News1 Marathi on August 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads