शहरातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले व हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई

 



ठाणे ,  प्रतिनिधी  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरु असून आज हातगाड्या तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.



        मुंब्रा प्रभाग समितीमधील स्टेशन रोड परिसर व गुलाब पार्क, तनवर नगर नाका व कौसा परिसरातील  फेरीवाले हटविण्यात आले.  तसेच १३ हातगाड्या जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या. उथळसर प्रभाग  समितीमधील सिंघ नगर, सिद्धेश्वर तलाव व  कोलबाड तसेच नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर धडक कारवाई करण्यात आली.



       दरम्यान कळवा प्रभाग समितीमधील कुंभारआळी येथील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयुरेश सोसायटीच्या  तळ अधिक ८ मजली अनधिकृत इमारतीच्या आठव्या मजल्याचे स्लॅब व अंतर्गत भिंती निष्कासित करण्यात आल्या.



       सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, शंकर पाटोळे आणि महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

Post a Comment

0 Comments