Header AD

महाड व चिपळूण पुरपरिस्थितीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव

 

■महाड तसेच चिपळूण परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये विशेष कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना सन्मानपत्र देवून गौरवताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे सोबत इतर मान्यवर....ठाणे , प्रतिनिधी  :   महाड तसेच चिपळूण परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध पथकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून विशेष गौरव करण्यात आला.          जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील, महापौर नरेश गणपत म्हस्के, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेता अशरफ ऊ.शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, पोलीस आयुक्त जयजीत सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी जिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत दशमाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आदी अधिकारी उपस्थित होते.

        


        राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाड, पोलादपूर तसेच चिपळूण या ठिकाणी मदतीसाठी पाठविण्यात आली होती.          या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या टीडीआरएफ, घनकचरा, पाणीपुरवठा, अग्निशमन, मलनि:स्सारण तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी व्यापक प्रमाणात कार्य केले. ही शहरे पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व पथकांनी कठोर परिश्रम घेतले.          सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आज प्रातिनिधिक स्वरूपात राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून विशेष गौरव करण्यात आला. 

      


        यामध्ये अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, आगार व्यवस्थापक दिलीप कानडे, उप नगर अभियंता गुणवंत झांबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झलके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, कार्यकारी अभियंता भारत भिवापुरकर तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांचा विशेष सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

महाड व चिपळूण पुरपरिस्थितीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव महाड व चिपळूण पुरपरिस्थितीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष गौरव Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads