ओरिगोने ई-मंडी प्लॅटफॉर्मवर पहिला एफपीओ व्यवहार पूर्ण केला
मुंबई, २७ ऑगस्ट २०२१ : घरपोच कृषी सेवा प्रदान करणाऱ्या फिन-टेक कंपन्यांमध्ये भारतातील सर्वात वेगाने विस्तार करणाऱ्या  ओरिगो कमोडिटीजने आपल्या ई-मंडी प्लॅटफॉर्मद्वारे एफपीओचा समावेश असलेला पहिला व्यापार पूर्ण करून मैलाचा टप्पा गाठला आहे. या व्यवहारात उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील बऱ्हाण गावात असलेल्या बऱ्हाण शेतकरी विकास उत्पादक कंपनी लिमिटेड (बऱ्हान केव्हीपीसीएल) चा समावेश होता, ज्यांनी हरदोई येथील श्री हनुमान ट्रेडिंगला १५ मेट्रिक टन गहू विकला. आता ओरिगो ई-मंडीसाठी व्यापार आणि वित्तीय  प्लॅटफॉर्म म्हणून, एफपीओसाठी थेट विक्रेते ते उत्पादन प्रक्रिया करणारे आणि त्यांना मुख्य उत्पादकांकडून खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी संधींचे दार उघडेल.      ओरिगो ई-मंडी प्लॅटफॉर्म भरपूर फायदे देते, ज्यात शेतकरी देशभरातील खरेदीदारांशी थेट संपर्क साधू शकतात, पारदर्शकता ठेवू शकतात.  प्रत्येक टप्प्यावर अद्ययावत व्यवहार आणि डिजिटल पेमेंट करू शकतात. खरेदीदारांसाठी, हा प्लॅटफॉर्म थेट व्यवहाराद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट खरेदी करण्याची आणि त्यांच्या खरेदीसाठी निधी देण्याची क्षमता प्रदान करते. ई-मंडी प्लॅटफॉर्म वेबवर तसेच आयओएस/ड्रॉईड पवर सहज हाताळण्याजोगा आहे.
      ओरिगो कमोडिटीजचे सहसंस्थापक सुनूर कौल म्हणाले, "ई-मंडी हे डिजिटल कृषी-व्यापार आणि वित्तीय सेवांसाठी आमचे 'सुपर प' आहे. संपूर्ण भारतात व्यापार, वित्त आणि योग्य किंमत ठरविणे सुलभ करण्याच्या दृष्टीने सेवेला सुलभता प्रदान करते. हा व्यवहार हे दर्शवितो की आम्ही शेतकऱ्यांना थेट उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्याशी जोडत आहोत आणि पारदर्शकता राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करीत आहोत. आम्ही अल्पभूधारक शेतकरी, एफपीओ यांच्याबरोबर काम करत आहोत आणि हा व्यवहार अमर्याद आहे."

Post a Comment

0 Comments