Header AD

मुलाच्या लग्नाच्या खर्चात २ हजार नागरिकांचे लसीकरण

 

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा आदर्श उपक्रम...

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं होतं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता.भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यामार्फत मोफत लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याची घोषणा त्यांनी मे महिन्यात केली होती. त्यानुसार आजपासून या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे. या उपक्रमातून आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे.आजपासून सुरू झालेली आ. गायकवाड यांची लसीकरण मोहीम ३ दिवस चालणार आहे. यामध्ये परिसरातल्या २ हजार नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा चालकघरकाम करणाऱ्या महिलालॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरेनगरसेवक मनोज राय  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुलाच्या लग्नाच्या खर्चात २ हजार नागरिकांचे लसीकरण मुलाच्या लग्नाच्या खर्चात २ हजार नागरिकांचे लसीकरण Reviewed by News1 Marathi on August 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads