पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ठाणे व नवी मुंबई कडून मदत रवाना- खासदार राजन विचारे
ठाणे, प्रतिनिधी : - शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसारशिवसेना नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मा. खासदार श्री. राजन विचारे साहेब व उपनेते श्री. विजय नाहटा साहेब यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील चरई येथून 2 मोठे कंटेनर तसेच नवी मुंबईतून 7 ट्रक रवाना करण्यात आले आहे. विशेषतः वाईमेढासातारापाटणसांगलीशिरोळ (कोल्हापूर) येथील बाधित गावातील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. त्यामध्ये जीवनावश्यक अन्नधान्य गृहोपयोगी भांडीशेगडीटोपकुकरताटवाटी, ग्लास, ब्लॅंकेटचादरीरजई यांचेही वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी साथीच्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य पथक व ॲम्बुलन्स रवाना करण्यात आली आहे. ठीक ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप केले जाणार आहे. साहित्य वाटप करण्यासाठी निघणारी वाहने काल शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथून माननीय खासदार श्री. राजन विचारे साहेब यांच्या उपस्थितीत मुक्कामी पाठविण्यात आल्या आहे.■नवी मुंबईकरांचे योगदान : -


नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा व बेलापूर विधानसभा मतदार संघातून खासदार राजन विचारे व  उपनेते श्री. विजय नाहटा साहेब यांच्या पुढाकाराने ठाणे व नवी मुंबई येथून संकलित अन्नधान्याच्या एकत्रित गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत या साठी नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुलेजिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईरविठ्ठल मोरेसर्व नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक  व  शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

0 Comments