लसीकरणात भेदभाव: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महासभा


राष्ट्रवादी काँग्रेसच्याा आंदोलनानंतर सर्व नगरसेवकांना निधी देण्याची महापौरांची घोषणा....


ठाणे (प्रतिनिधी) -  ठाणे शहरामध्ये केवळ प्रशासनाच्या मनमर्जीवर लसीकरणाची शिबिरे आयोजित करण्याात येत असतात. मात्र, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी लसीकरणासाठी शिबिराची मागणी केल्यानंतरही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही. तसेच, अनेकदा महासभेमध्ये प्रशासनाच्या विरोधात बोलल्यास आवाज म्यूट केला जात आहे.              या निषेधार्थ शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली व विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभा उधळून लावली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी नगरसेवक आणि प्रभाग विकास निधीबाबत तत्काळ वितरीत करण्याचे आदेश दिले. अर्थ संकल्पाची अंमलबजावणी होत नाही.               तसेच, दूषीत पाणीपुरवठा प्रकरणीं स्टेमच्या अधिकार्‍यांवरील कारवाई, स्मशानातील भ्रष्टाचार, लसीकरणातील दुजाभाव, नगरसेवकांची कामे  या प्रकरणी ठाणे पालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते.           त्यावेळी आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता न झाले नसतानाच महासभा सुरु असतानाच प्रशासनाला लक्ष्य करणार्‍याा नगरसेवकांचे आवाज प्रशासनाकडून म्यूट केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी  नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये घोषणाबाजी करीत प्रवेश करुन महासभा उधळून लावली.              लसीकरण हे ठामपाच्या अधिपत्याखाली होणे गरजेचे असताना सत्ताधार्‍यांच्या दबावापुढे झुकून प्रशासन ठराविक भागातच लसीकरण मोहीम राबवित आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी करुनही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाही. स्थायी समितीच बेकायदेशीर आहे, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी, लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवावी,या मागण्यांसाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन केले.            या आंदोलनानंतर महापौरांनी, नगरसेवक निधीचे 14 आणि प्रभाग विकास निधीचे 25 लाख देण्याबाबत लवकरच ठराव पारीत करण्यात येणार असून हा निधी लवकरच वितरीत करण्यात यावा, असे आदेश दिले.  विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी, ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरु आहे. अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडविण्यात आलेली आहेत.           ही कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे करण्यात आलेले नाहीत. स्टेममधून होणार्‍या दुषित पाणी पुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करुनही कारवाई करण्यात आलेली नाही.             स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. त्याचेही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, पालिका आयुक्तांकडून कारवाई होत नाही. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. जर, चुकीचे घडत असले तर पालिका आयुक्तांनी ते योग्य करणे गरजेचे असतानाही आयुक्तांकडून अशी कृती केली जात नाही. लसीकरणाच्या चार व्हॅन असताना त्या ठराविक भागातच पाठविल्या जात आहे.            प्रशासनाकडूनच नगरसेवकांचे आवाज म्यूट केले जात आहेत. लसीकरणात प्रशासनाकडूनच घोळ घातले जात आहेत. प्रशासनाकडून र्साांना समान संधी देण्याची तरतूद असतानाही प्रशासन जर कोणाच्या सांगण्यावरुन आवाज म्यूट केला जात असेल तर तो संविधानिक अधिकारांचे हनन होत असल्यानेच आजचे आंदोलन झाले, असेही पठाण म्हणाले.            प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांनी सत्ताधार्‍यांवर तसेच प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. सध्या गठीत असलेली स्थायी समिती बेकायदेशीर असल्याने स्थायी समितीची तत्काळ निवडणूक घ्यावी, नगरसेवकांना तत्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा, लसीकरण सर्वच ठिकाणी करावे, या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. आमचे आंदोलन हे विकास करण्यासाठी आहे.                मात्र, विरोधकांनी आवाज उठविल्यास सचिवांकडून ऑनलाईन महासभेत नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जात आहे. त्यामुळे सचिवांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असेही देसाई यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments