लेवरेज एडूद्वारे स्कॉलर शिप विजेत्यांची घोषणा


■५ कोटी रुपये मूल्याची भारतातील सर्वात मोठी लेवरेज एडू स्टडी अब्रॉड स्कॉलरशिप ~


मुंबई, १६ ऑगस्ट २०२१ : लेवरेज एडू ने आज लेवरेज एडू स्कॉलर्सची नवी बॅच जाहीर केली. या विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला सुरु केलेली ५ कोटी रुपये मूल्याची भारतातील सर्वात मोठी लेवरेज एडू स्टडी अब्रॉड स्कॉलरशिप जिंकली आहे. आजचे हे लेवरेज एडू स्कॉलर्स भारतातील ४० पेक्षा जास्त शहरांतील असून त्यापैकी ६०% टीअर २/३ शहरांतील आहेत. लेवरेज एडूने दिलेल्या अहवालानुसार, या वर्षी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विशेषत: यूकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपच्या पेजवर खूप ट्रॅफिक दिसत आहे.      लेवरेज एडू स्कॉलरशिप पुरस्कार विजेता निखिल अग्रवाल म्हणाला, “कधीही झोपत नसलेल्या लंडन शहरात मला रहायचे होते, तिथला अनुभव घ्यायचा होता. क्वीन मेरी यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन ही रसेल ग्रुप युनिव्हर्सिटीतील असून रँकिंग आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. लेवरेज एडू शिष्यवृत्ती मिळाल्याने मी आनंदी आहे. माझे पालक, मित्र आणि लेवरेज एडूने माझ्यावर दर्शवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यास मी समर्थ आहे, असे मला वाटते.”

 


       “आकृतीला लेवरेज एडूची शिष्यवृत्ती मिळाली आणि शिक्षणासाठी ती विदेशात जात असल्याचा आम्हाला आनंद आहे. तिने शिक्षण पूर्ण करून भारतात परत यावे, अशी आमची इच्छा आहे. देशाच्या कल्याणासाठी तिला ही कौशल्ये वापरता येतील.” असे लेवरेज स्कॉलर आकृती खेराची आई म्हणाली.

 


        “कार्डिफ युनिव्हर्सिटीत प्रवेश घेणे हे माझे स्वप्न पूर्ण झाले असून शिष्यवृत्ती मिळळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. आयुष्यातील पुढील काही वर्षे अत्यंत निर्णायक असतील आणि नंतर माझ्या पीएचडी डेझर्टेशनसाठी महत्त्वाची ठरतील. मी सज्ज आहे आणि आता फार वाट पाहू शकत नाही,” असे नवी दिल्लीचा रहिवासी आणि लेवरेज एडूचा स्कॉलर अभिषेक गौर म्हणाला.

Post a Comment

0 Comments