शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाच्या पाठपुराव्याला यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाच्या वतीने माध्यमिक शिक्षण आधिकारी ठाणे शेषराव बढे  आणि वेतन पथक अधिक्षक संतोष कांबळेठाणे यांच्या सोबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक विकास पाटीलकोकण विभाग संयोजकएन. एम. भामरेकोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकरयांनी शिक्षक-शिक्षकेत्तरांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे बाबत चर्चा करून निवेदन दिले. यावेळी अधिक्षक संतोष कांबळे यांचा सत्कार ही करण्यात आला.यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मयोग्यांचं वेतन प्रत्येक महिन्याला १ तारखेलाच खात्यात जमा होणेसाठी कार्यवाही करणे,  शिक्षकांसाठी वरीष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजन करणेसाठी वरिष्ठांकडे तत्परतेने शिफारसवजा पाठपुरावा करणे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं तातडीने समायोजन शिबिर आयोजन करणे.  कला शिक्षकांना ए.एम. वेतनश्रेणी लागू करणेसाठी शाळांनी प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र काढणे. शालार्थ आयडीची प्रलंबित प्रकरणे सोडविणेसाठी कालबध्द् नियोजन करणे. अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांच्या प्रस्तावास मान्यता देणे.  मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक यांना मान्यता देणे. बंद पडलेल्या रात्र शाळेवरील अतिरिक्त शिपाई कर्मचाऱ्यांचं प्रयोगशाळा सहाय्यकपदी केलेल्या संस्थांतर्गत समायोजनास मान्यता देणे. या विषयांवर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. त्या अनुषंगाने शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे पत्र ही त्यांनी तात्काळ काढले.तसेच संतोष कांबळे वेतन अधिक्षक भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकजि. प. ठाणे. कोरोनाकाळात शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्तांची अनेक कामे निर्णयाअभावी पडून आहेत. या प्रलंबित प्रकरणांचा सकारात्मक विचार करून तातडीने सोडवणूक करावी असे निवेदन त्यांना देण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचं दरमहा वेतन बँक खात्यात १ तारखेलाच जमा करणेसाठी कार्यवाही करणे. सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचा सातव्या वेतन आयोग फरक बीलाचा १ ला व २ राहप्ता एकाचवेळी बँक खात्यात जमा करणेसाठी कार्यवाही करणे.  सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची  प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली रजा रोखीकरण बिले सातव्या वेतन आयोगानुसार बँक खात्यात त्वरेने जमा करणेसाठी कार्यवाही करणे.  शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पी. एफ. स्लीप तत्परतेने देणेसंबंधी उचित कार्यवाही करणे. या विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले. या निवेदनाची एक प्रत माहिती साठी कोकण विभागाचे पदवीधर  आमदार निरंजन डावखरे यांना देण्यात आली.

Post a Comment

0 Comments