डोंबिवलीत शंखनाद करीत भाजपाचे मंदिर उघडा आंदोलन

डोंबिवली  ( शंकर जाधव )  कोरोना संक्रमणमुळे गेले वर्षभर ठाकरे महाविकास आघाडी सरकारने मंदिरे बंद ठेवली आहेत. आता दारू दुकाने, हॉटेल्स बाजार सुरू झाले आहेत तरीही मंदिरे बंद आहेत. भाविकांना देवाचे दर्शनही घेता येत नाही. ठाकरे सरकारला महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून मंदिरे बंद ठेवली आहेत.           
          त्यांना अल्पसंख्याकांची पाठराखण करायची आहे पण भाजपा हे चालू देणार नाही. मंदिरे उघडी झालीच पाहिजे यासाठी शंखनाद करीत गणेशमंदीर समोर आंदोलन केले. सोमवारी सकाळी पूर्वेकडील फडके रोडवरील गावकीचे मंदिर म्हणून ओळखळे जाणाऱ्या श्रीगणेश मंदिरासमोर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आध्यात्मिक आघाडी तर्फे शंखनाद करीत मंदिर उघडा आंदोलन केले. 

           यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू जोशी, संजय कुलकर्णी,डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी सरचिटणीस अमृता जोशी,  माजी नगरसेविका खुशबू चौधरी, रंजिता मोरे,  माजी नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, राजन आभाळे, निलेश म्हात्रे, पप्पू म्हात्रे , नंदू जोशी,पंढरीनाथ म्हात्रे, मितेश पेणकर,  मोहन नायर,  केवल शहा, संजीव बिरवाडकर, दिनेश दुबे, एॅॅड. माधुरी जोशी,वर्षा परमार,  यांच्यासह अध्यात्मिक आघाडी पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

              यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, राज्यात आता सर्वच्या सर्व वाईनशॉप सुरू आहेत पण मंदिरे बंद आहेत. देशात जर भाविकांना मंदिरात दर्शन मिळते मग इथे का नाही. ठाकरे सरकारला वारंवार विनावण्या करून झाल्या पण तरीही मंदिरे बंद ठेवली आहेत. महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून ठाकरे सरकार अल्पसंख्याकांची पाठराखण करीत त्यांच्या सणाला परवानगी देत आहे. सरकारने मानक ऑपरेटिंग प्रकिया   राबवून मंदिरे खुली करावी त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील असेही चव्हाण म्हणाले.

Post a Comment

0 Comments