नगरसेवक कुणाल पाटील यांचे सामुहिक रक्षाबंधन दोन हजार महिलांनी बांधल्या राख्या
कल्याण ,म्हात्रे  : दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावतीने सामुहिक रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी प्रभागातील सुमारे दोन हजार महिलांनी पाटील यांना राख्या बांधल्या.रविवारी कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रभागातील सर्व माता भगिनींनी उपस्थित राहून पाटील यांना राखी बांधून ओवाळले. वर्षभर समाजातीलप्रभागातील व परिसरातील नागरिकांच्या हितासाठी काम करत असतांना अनेकांसोबत ऋणानुबंध जुळतात तेव्हा अश्या अनेक बहिणींशी आपुलकीचेस्नेहाचे नाते निर्माण होते. अगदी वयस्कर महिलांपासून ते लहान मुलींपर्यंत हक्काने राखी बांधून सन्मान व प्रेम दिले जाते. समाजातील व प्रभागातील सर्व बहिणींच्या पाठी हा भाऊ प्रत्येक कठीण प्रसंगी उभा राहील,अशी ग्वाही नगरसेवक कुणाल पाटील यांनी महिलांना दिली. तसेच प्रत्येक महिलेला भेटवस्तू देखील देण्यात आली.


Post a Comment

0 Comments