Header AD

डीपी रस्त्यामध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर केडीएमसी निष्कासनाची कारवाई आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरातील इमारत




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरात डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, इ प्रभाग अधिकारी भारत पवार, किशोर खुताडे यांच्या पथकांसह संयुक्तपणे केलिया आहे. या बांधकामाबाबत वास्तुविशारद संदीप पाटील यांनी तक्रार केली होती.



       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. अशाच प्रकारे दावडी येथील तुकराम चौक याठिकाणी विकासक राम लखन यादव यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.



       दरम्यान संदीप पाटील यांच्या तक्रारी नुसार हि कारवाई करण्यात आली असून वारंवार या इमारतीच्या बांधकामाबद्दल तक्रार आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा एमआरटीपी प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आज आय, इ आणि ड प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक पोकलेन, एक गॅस कटर च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

डीपी रस्त्यामध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर केडीएमसी निष्कासनाची कारवाई आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरातील इमारत डीपी रस्त्यामध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर केडीएमसी निष्कासनाची कारवाई आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरातील इमारत   Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads