राज्य सरकारचा निषेध करत डोंबिवलीत भाजपाने दहीहंडी फोडली


 डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाचे निर्बध लागू करून राज्य सरकार हिंदू सणावर गदा आणल्याचे सांगत सण साजरा करणारच अशी भूमिका घेत डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी करोना नियमाचे पालन करत मानवी मनोरे न रचरा दहीकला उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी आमदार चव्हाण यांनी राज्य सरकारचा निषेध केला. 

          बाजी प्रभू चौकात लावण्यात आलेली दहीहंडी भाजप युवा मोर्चा  कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई याने फोडली. जय श्रीराम जय जय श्रीरामच्या गगनभेदी गजरात करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेनंदू जोशीमिहीर देसाईसंदीप पुराणिकमोहन नायरसंजीव बिडवडकरपूनम पाटील, मनीषा राणे, डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी सरचिटणीस  अमृता जोशी मनीषा छल्लारे, वर्षा परमार, नंदू जोशी, मिहीर देसाई, मयुरेश शिर्के, माजी नगरसेवक संदीप पुराणिक, राजन आभाळे,माजी नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, नंदू जोशी, मोहन नायर,कृष्णा परुळेकर, मितेश पेणकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.          आमदार रवींद्र चव्हाण यांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचे पूजन केले तर महिलांनी पंचारती केली. दरम्यान गोविंदाच्या गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी गोकुळअष्टमी आनंद अनुभवलायावेळी आमदार चव्हाण म्हणालेहिंदू सण साजरे करावेत यासाठी आम्ही आग्रही राहणारच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडीची पूजा करण्यात आली. सर्व नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा केला. आघाडी सरकारची हिंदू सणांवर नियमावली लावायची भूमिका असून इतर सर्व सणांना खुलेआम परवानगी द्यायची हे अत्यंत चुकीचे आहे. सरकारचे हे धोरण हिंदूंवरती अन्यायकारक आहे. या आघाडी सरकारच्या धोरणाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो.

Post a Comment

0 Comments