Header AD

एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग

 मुंबई, १६ ऑगस्ट २०२१ :  एन्व्हायरोनिक्स, या पर्यावरणाद्वारे आरोग्यसंबंधी कंपनी स्वत:च्या मालकीची रेडिएशन टेक्नोलॉजी वापरत समाजाची सुरक्षितता आणि कल्याण यात वृद्धी करते. आज ह्युमनॉइड आकारात आपल्या नव्या ब्रँडच्या लोगोचे अनावरण ब्रँडची टॅगलाइन ‘युअर वेलबीइंग, आवर कन्सर्न’ यासह केले. ब्रँडचा व्हायब्रंट ग्रीन आणि ब्लू लोगो ‘द लिव्हिंग अॅस्टेरिक्स’ प्रतिबिंबित करतो. स्वत:ची आवश्यक प्रतिमा जपत, लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी आकार व स्वरुप जुळवून घेऊ शकतो.       या घोषणेद्वारे, कंपनीने लहान परंतु आयकॉनिक पावले उचलत, लोकांचे आरोग्य व कल्याणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मागील वर्षांत, एनव्हायरोनिक्सने निरोगी वेलनेस स्पेस प्रदाता बनण्यासाठी विकास केला आहे. याद्वारे निरोगी व आनंदी जीवन जगत असताना लोकांना त्यांच्यातील पूर्ण क्षमतेची जाणीव करून देत, उद्याचा काळ आजपेक्षा चांगला होण्यासाठी त्यांना सक्षम केले जाते.         जीवन आणि ते उत्तम, निरोगी आणि तणावमुक्त जगण्याचे शास्त्र, यावर दृढ विश्वास असलेल्या एनव्हायरोनिक्सने लोकांची आरोग्याप्रती वचनबद्धता यशस्वी करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. याकरिता जीवाणू, विषाणू धोका कमी करणारी तसेच प्रतिकारशक्ती वाढवणारी उत्पादने सादर केली आहेत.      एनव्हायरोनिक्सचे सह संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री अजय पोदार म्हणाले, “धोकादायक उत्सर्जन मग ते मानवनिर्मित असो वा पर्यावरणीय, या सर्वांत न दिसणारे धोके असतात. यामुळे आपले आरोग्य व एकूण जीवनमानावर तसेच कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या मूक धोक्यांपासून लोकांना स्वत:चे संरक्षण करण्याकरिता उपाय शोधण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.        नवीन ब्रँड लोगो आणि ओळखीद्वारे, आम्ही लोकांना या घटकांच्या धोकादायक प्रभावांविषयी जागरूक राहण्याचे आणि त्यांच्याशी सामना करण्यासाठी तसेच अधिक आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या लोक आरोग्याबाबत अधिक सजग होत आहेत, त्यामुळे भविष्यात याची मोठी भूमिका असल्याचे आम्हाला वाटते.      २०२३ च्या अखेरीस, जागरूकता वाढवत, सामाजिक संस्थांशी भागीदारी करुन सरकार आणि कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमांद्वारे १०० दशलक्ष लोकांच्या आयुष्याला स्पर्श करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग एनव्हायरोनिक्सचे लोगो रीब्रँडिंग Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads