भिवंडीतील सायझिंग उद्योग विविध मागण्यांसाठी एक आठवडा राहणार बंद...

 भिवंडी दि 10(प्रतिनिधी ) शहरातील यंत्रमाग व्यवसायास पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा सायझिंग व्यवसाय विविध मागण्यांसाठी तब्बल एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय भिवंडी सायझिंग वेल्फेअर असोसिएशन या संघाचे अध्यक्ष अजय यादव यांनी घोषित केला आहे .


           भिवंडी शहरात 103 सायझिंग कारखाने असून त्यामध्ये तब्बल   300 हुन अधिक सायझिंग मशीन दिवसरात्र सुरू असतात परंतु या व्यवसायावर सुध्दा महागाई मुळे व कोरोना संकटामुळे गंडांतर आले असून या वावसायावर तब्बल 25 हजार मजूर कामगार अवलंबून आहेत .         यंत्रमाग कारखानदारांना ज्याप्रमाणे वीज दरात सवलत दिली जाते तशी सवलत सायझिंग व्यवसायिकांना मिळावी ,कच्चा मालाचे भाव वाढले असल्याने सायझिंग होणाऱ्या मालाची भाव वाढ झाली पाहिजे ,त्या सोबतच सायझिंग च्या बॉयलर मध्ये ज्वलना साठी दगडी कोळसा 10 रु तर लाकडे 5 रु प्रति किलो मिळत असून त्यामुळे काही सायझिंग चालक  भिवंडी सह कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई येथील भंगार व्यवसायिकांशी संधान बांधून 2 रु प्रति किलो प्लास्टिक कचरा आणून रात्रीच्या सुमारास जाळत असल्याने त्यामुळे पर्यावरणात हवेत घटक धूर पसरून त्याचा नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या संघाच्या असून त्यासाठी एक आठवडा काम बंद आंदोलन करण्यात येत  असल्याची माहिती अजय यादव यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments