शिवसेनेच्या वतीने आदिवासी पाड्यांवर अन्नधान्य वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून शिवसेनेच्या वतीने नगरसेवक मोहन उगले यांच्या पुढाकाराने आदिवासी पाड्यांवर अन्नधान्य वाटप करण्यात आले.          कल्याण पश्चिम आधील शिवसेना ठाणकर पाडा विभागाच्या वतीने मोहीली गाव या ठिकाणी जाऊन पस्तीस आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य स्वरूपात मदत करण्यात आली. हि मदत नसून हे आपले कर्तव्य आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे नगरसेवक तथा विभाग प्रमुख मोहन उगले यांच्या पुढाकाराने हि मदत पोहोचविण्यात आले.यावेळी उपशहर प्रमुख विजय काटकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे, महिला शाखा संघटक सुजाता धारगळकरसंगीता राजगुरूतेजश्री सपकाळ, शाखाप्रमुख स्वप्नील मोरे, अनंता पगार,  संघटक नेत्रा मोहन उगले, महिला शाखा संघटक कल्पना जमदाडे, महिला शाखा संघटक मीना सावंत, सुरेखा दिघेसुरेखा शिंदे, सचिन भाटे, संदीप पगारे, उमेश भुजबळ, संतोष झोडगे, निलेश चोणकर, दीपक भालेराव, प्रदीप मोरे,  आशिष झाडेप्रदीप हुले, युवा सेना संघटक रोहन कोट, सुनिता मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments