लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी प्रयत्न करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.1 - साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव योगदान दिले.कामगार शोषित पीडित वर्गाचे  दुःख वेदना साहित्यातून मांडली. साहित्य आणि समाज क्षेत्रात अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानाचा  गौरव होण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च किताब मिळाला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. सुमन नगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज त्यांच्या 101 व्या जयंती निमित्त ना. रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


       

           यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;सिद्धार्थ कासारे;  अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समिती चे निमंत्रक विशाल तुपसुंदर; रिपाइं चे मातंग समाज आघाडी चे मुंबई अध्यक्ष नंदू साठे; रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.               लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मातंग समाजात जन्माला आले पण आपल्या लेखन प्रतिभेच्या बळावर सर्व जगात श्रेष्ठ साहित्यिक ठरले. त्यांनी संघर्षाची वाट धरली.कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी ते लढले.पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामागरांच्या तळहातावर तरली आहे.असे सांगत कामगारांची बाजू आपल्या लेखणीतून अण्णा भाऊ साठे यांनी मांडली.             त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. जग बदल  घालूनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव ही कविता लिहून सर्व मातंग दलित बांधवांना एकजुटीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समतेच्या मार्गाने जाण्याचा संदेश दिला. असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments